pune news : अमनोरा स्‍कूलकडून सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शन यशस्‍वी आयोजन

Updated On:
pune news : अमनोरा स्‍कूलकडून सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शन यशस्‍वी आयोजन

पुणे – अमनोरा स्‍कूल आयोजित केलेल्‍या सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. शाश्‍वत भविष्‍यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या थीमवर आधारित या प्रदर्शनामध्‍ये पुणे प्रांतामधील ७० हून अधिक शाळांमधील १०६ टीम्‍स एकत्र आल्‍या.

या प्रदर्शनाच्‍या उद्घाटनासाठी माजी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, विश्‍वस्‍त जे. के. भोसले, आदित्‍य देशपांडे, अमनोरा स्‍कूलच्‍या संचालक व मुख्‍याध्‍यापिका मीरा नायर आदी उपस्थित होते.

विशाल सोळंकी यांनी विद्यार्थ्‍यामधील वैज्ञानिक वृत्तीच्‍या महत्त्वावर भर दिला आणि महाराष्‍ट्रातील शालेय प्रमुख व मार्गदर्शकांच्‍या प्रयत्‍नांचे कौतुक केले. अमनोराच्‍या विद्यार्थ्‍यांनी तयार केलेल्‍या चंद्रयान मॉडेलच्‍या भव्‍य प्रदर्शनासह या प्रदर्शनाला अधिकृतरित्‍या सुरूवात झाली.

इयत्ता सहावी ते अकरावीमधील विद्यार्थ्‍यांनी विविध सब-थीम्‍सवर आधारित संशोधन-स्थित प्रकल्‍पांना दाखवले. त्यात अन्‍न, आरोग्‍य व स्‍वच्‍छता, परिवहन आणि दळवणवळण, नैसर्गिक शेती, आपत्ती व्‍यवस्‍थापन, गणितीय मॉडेलिंग व संगणकीय विचार, कचरा व्‍यवस्‍थापन, संसाधन व्‍यवस्‍थापन आदींचा समावेश होता.

सीबीएसईने वैद्यकीय, विज्ञान व तंत्रज्ञान, कचरा व संसाधन व्‍यवस्‍थापन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा क्षेत्रांमधील विशेष निवडलेल्‍या तज्ञ परीक्षकांच्‍या पॅनेलने प्रकल्‍पांचे मूल्‍यांकन केले. मूल्‍यांकनानंतर राष्‍ट्रीय फेरीसाठी १५ टीम्‍सची निवड करण्‍यात आली. इयत्ता ६वी ते ८वी गटामधून सात टीम्‍स आणि इयत्ता ९ वी ते ११ वी गटामधून आठ टीम्‍स आहे.

या प्रदर्शनामध्‍ये सैद्धांतिक संकल्‍पनांना व्यावहारिक उपयोजनांमध्‍ये आणण्‍यासाठी विद्यार्थ्‍याची अपवादात्‍मक क्षमता दिसून आली, असे अमनोरा स्‍कूलच्‍या संचालक व मुख्‍याध्‍यापिका मीरा नायर यांनी सांगितले. या तरूण इनोव्‍हेटर्सनी वैज्ञानिक संशोधनाच्‍या माध्‍यमातून वास्‍तविक विश्‍वातील आव्‍हानांचे निराकरण करण्‍यामधील उल्‍लेखनीय माहिती दाखवली आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

पात्र ठरलेल्‍या टीम्‍स राष्‍ट्रीय फेरीसाठी तयारी करत असताना या इव्‍हेंटमधून महाराष्‍ट्रातील तरूणांमधील वैज्ञानिक वृत्ती आणि भावी वैज्ञानिक व नवप्रवर्तकांना निपुण करण्‍यामधील शैक्षणिक संस्‍थांची समर्पितता दिसून येते. या प्रदर्शनाच्‍या विशेषत: शाश्‍वत सोल्‍यूशन्‍सवरील फोकसमधून दिसून आले की, भावी पिढी भविष्‍यातील वैज्ञानिक प्रयत्‍नांसाठी प्रबळ पाया रचत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Pune Dahi Handi : पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

2026-09-05 22:35:11

Pune Dahi Handi : पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

Pune Court : मनसेच्या तिघा कार्यकर्त्यांना जामीन; पंतप्रधान मोदींचे छायाचित्र हटवल्याचे प्रकरण

2026-09-05 21:17:44

Pune Court : मनसेच्या तिघा कार्यकर्त्यांना जामीन; पंतप्रधान मोदींचे छायाचित्र हटवल्याचे प्रकरण

Shirur News : शिरूर पालिकेचे कुजलेले पाईप गेले कुठे? चोरीच्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु

2026-09-05 17:48:34

Shirur News : शिरूर पालिकेचे कुजलेले पाईप गेले कुठे? चोरीच्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु

Pune Traffic Changes : हडपसरमध्ये दहीहंडीमुळे वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग पाहा

2026-09-05 15:57:29

Pune Traffic Changes : हडपसरमध्ये दहीहंडीमुळे वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग पाहा

Pune News : दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; पुण्यात 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

2026-09-05 12:30:30

Pune News : दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; पुण्यात 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू