Pune News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास बस भेट !

पुणे – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास एचडीएफसी बँकेच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी अर्थात सीएसआर निधीतून महिंद्र क्रुझिओ ही एक ४४ आसनी बस भेट म्हणून देण्यात आली. विद्यापीठ मुख्यालयात बस हस्तांतर कार्यक्रम पार पडला.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे यांच्या विशेष प्रयत्नातून ही बस विद्यापीठास प्राप्त झाली आहे.
बसचा उपयोग वेळ प्रसंगानुसार विद्यापीठातील कार्यरत शेतमजूर, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, विद्यापीठास भेट देणारे अभ्यागत, अतिथी, शिष्टमंडळ यांची ने – आण करण्यासाठी केला जाणार आहे.
ज्याचा विद्यापीठ व संबंधित व्यक्ती असा दोघांना फायदा होणार आहे. त्यातून वेळेची, पैशांची व इंधनाची बचत होणार असल्याचे कुलगुरु डाॅ. सोनवणे म्हणाले.
यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. संजीवनी महाले, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, एचडीएफसी बँकेचे राहुल देशपांडे, प्रसाद गोरेगावकर, कुणाल कपूर यांच्यासह विद्यापीठातील विविध विद्याशाखा संचालक, अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन कुलसचिव दिलीप भरड यांनी केले.





