pune news : आईच्या खुन प्रकरणी तब्ब्ल ६ वर्षेनंतर जामीन मंजूर

pune news : आईचा खून केल्याप्रकरणात सहा वर्षे तुरूंगात असलेल्याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी हेडाऊ यांनी जामीन मंजुर झाला आहे. आबा उर्फ शंकर जावळे असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. प्रणित नामदे व ॲड. अजित पवार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. आई व मुलामध्ये वाद विवाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात मुलाने आईच्या डोक्यात लाकडी फळी मारली. त्यामुळे आईचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आबा याला अटक केली आहे.
घटनेच्या वेळी घरगुती भांडणा मधून हा गुन्हा झालेला आहे. आरोपीला त्याच्या आईला मारण्याचा कोणताही उद्देश दिसून येत नाही. आरोपीच्या भावा व्यतिरिक्त इतर कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही,
तसेच गुन्हा सिद्ध होईपर्यंत आरोपीला जेलमध्ये ठेवणे योग्य ठरणार नाही, त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी ॲड प्रणित नामदे व ॲड अजित पवार यांनी युक्तिवादात केली. ही मागणी ग्राह्य धरण्यात आली





