Pune news : पुणे स्टेशनवर जबरी चोरीचा प्रयत्न; दोन आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी पकडले

पुणे – पुणे रेल्वे स्टेशनवर पहाटे एका तरुणाला मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले. अंबादासजी फोटजावरे ( १९) व प्रसाद दत्तू कांबळे ( २७, दोघेही फिरस्ते, पुणे स्टेशन) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी संतोष अनिल जाधव (व २२, रा. गंगानगर, ता. किनवट, जि. नांदेड) हा ९ सप्टेंबर रोजी पहाटे पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर थांबला असताना तीन अनोळखी व्यक्तींनी त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.
फिर्यादी यांनी नकार दिल्यावर आरोपींनी त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचदरम्यान एका आरोपीने धारदार शस्त्राने जाधव याच्या पोटावर आणि हातावर वार करून त्याला जखमी केले.या घटनेनंतर बंडगार्डन पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला.
तपासादरम्यान अंमलदार ज्ञानेश्वर बडे, मनोज भोमरे आणि मनिष संकपाळ मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी महेश अंबादासजी फोटजावरे (वय १९) व प्रसाद दत्तू कांबळे (वय २७, दोघेही फिरस्ते, पुणे स्टेशन परिसरात वास्तव्य) यांना अटक करण्यात आली. मात्र हा प्रकार लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी आरोपींना लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त संगिता आल्फान्सो शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकात उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, प्रदीप शितोळे, सारस साळवी, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे आणि शिवाजी सरक आदींचा समावेश होता.





