Pune News : पुणे येथे ACCE (I) तर्फे नवीन कार्यकारिणी समिती प्रस्थापना व तज्ज्ञ मार्गदर्शन सत्र उत्साहात संपन्न
Association of Consulting Civil Engineers (India) – ACCE (I) पुणे सेंटरतर्फे आयोजित “नवीन कार्यकारिणी समिती प्रस्थापना व तज्ज्ञ मार्गदर्शन सत्र” शिवाजीनगर येथील (Pune News) टारवडे क्लार्क्स इन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

Pune News : Association of Consulting Civil Engineers (India) – ACCE (I) पुणे सेंटरतर्फे आयोजित “नवीन कार्यकारिणी समिती प्रस्थापना व तज्ज्ञ मार्गदर्शन सत्र” शिवाजीनगर येथील (Pune News) टारवडे क्लार्क्स इन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. बांधकाम, पायाभूत सुविधा आणि स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून Ministry of Road Transport and Highways (MoRTH) चे मुख्य अभियंता महाराष्ट्र व गोवा राज्य इंजिनिअर प्रशांत फेगडे उपस्थित होते. यावेळी ACCE (I) चे राष्ट्रीय पदाधिकारी तसेच पुणे सेंटरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात नवीन कार्यकारिणी समितीची प्रस्थापना (Pune News) करण्यात आली. त्यानुसार इंजिनिअर विजया बिष्ट यांनी चेअरपर्सन, इंजिनिअर दीपाली कुलकर्णी यांनी सेक्रेटरी तर इंजिनिअर राहुल हंकारे यांनी ट्रेझरर म्हणून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी पदभार स्वीकारला.
ACCE (I) ही संस्था १९८५ पासून देशभरात कार्यरत असून भारतातील ५२ हून अधिक केंद्रांद्वारे स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यावसायिक अभियंत्यांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. विशेष म्हणजे, इंजिनिअर विजया बिष्ट यांनी ACCE (I) च्या इतिहासातील पहिल्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा होण्याचा मान मिळाला आहे. यावेळी त्यांनी पुणे शहर व परिसरातील अधिकाधिक स्थापत्य अभियंत्यांनी संस्थेशी जोडले जावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान ACCE (I) चे माजी दक्षिण विभाग उपाध्यक्ष इंजिनिअर राजकुमार कचरेला यांनी स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात मार्गदर्शन केले. आगामी काळात स्थापत्य अभियांत्रिकी ही देशाच्या विकासातील अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी शाखा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्यविकास आणि सातत्यपूर्ण ज्ञानवृद्धीच्या माध्यमातून अभियंत्यांनी स्वतःला सक्षम बनविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. प्रशिक्षित आणि अद्ययावत अभियंतेच सक्षम राष्ट्रनिर्मितीस हातभार लावू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे इंजिनिअर प्रशांत फेगडे यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयांतर्गत (MoRTH) राबविण्यात येणाऱ्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची तसेच राष्ट्रीय महामार्गांच्या सध्याच्या व आगामी विकासकामांची सविस्तर माहिती दिली.
आधुनिक महामार्ग, शहरी वाहतूक व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील विकास आराखड्यांबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सादरीकरणास उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास Builders Association of India (BAI), Architects Engineers and Surveyors Association (ASEA), Indian Geotechnical Society (IGS) यांसह विविध व्यावसायिक संस्थांचे प्रतिनिधी, अभियंते, तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील सुमारे ८० ते ९० मान्यवर उपस्थित होते.
तसेच I-Stron Car Parking Systems आणि Jindal Stainless यांनी प्रायोजक म्हणून सहभाग घेत तांत्रिक सादरीकरणे केली. आधुनिक कार पार्किंग सिस्टीम, स्टेनलेस स्टीलचा बांधकाम क्षेत्रातील वापर आणि नव्या तांत्रिक उपाययोजनांविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन (Pune News) अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक करण्यात आले होते. उपस्थित अभियंते आणि तज्ज्ञांनी अशा प्रकारचे ज्ञानवर्धक व उद्योगाभिमुख कार्यक्रम स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रासाठी प्रेरणादायी आणि उपयुक्त असल्याची भावना व्यक्त केली.






