ऊस तोडणीचे पैसे न दिल्याने मुलाचे अपहरण
Updated On:

पिंपरी, (प्रतिनिधी) – ऊस तोडणीसाठी घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून एकाच्या मुलाचे अपहरण केले. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. शुभम प्रवीण वाघमारे (वय २०) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संदिपान फड उर्फ फड आबा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती प्रवीण यांनी आरोपी फड याच्याकडून ऊस तोडणीसाठी पैसे उचल म्हणून घेतले.
प्रवीण हे कॅब चालक आहेत. ५ फेब्रुवारी रोजी ते कामावर गेले असताना फड याने त्यांचा मुलगा शुभम याचे अपहरण करून त्याला डांबून ठेवले. फिर्यादीकडे पैशांची मागणी करत मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. फौजदार एम. एस. भालेराव तपास करत आहेत.





