Pune News : आसामच्या युवक-युवतींच्या हस्ते पुण्याच्या महापौर निवासमधील श्रींची आरती संपन्न
पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाची परंपरा, संस्कृती आणि भक्तीभाव जवळून अनुभवण्यासाठी आसाम व ईशान्य भारतातून पुण्यात (Pune News) आलेल्या ICYE Cultural Exchange Program मधील युवक-युवतींचे महापौर निवास येथे स्वागत करण्यात आले.

Pune News : पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाची परंपरा, संस्कृती आणि भक्तीभाव जवळून अनुभवण्यासाठी आसाम व ईशान्य भारतातून पुण्यात (Pune News) आलेल्या ICYE Cultural Exchange Program मधील युवक-युवतींचे महापौर निवास येथे स्वागत करण्यात आले.
महापौर मंजुषा नागपुरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या हस्ते श्री गणरायाची भक्तिभावाने आरती (Pune News) संपन्न झाली. यावेळी पुण्याच्या गणेशोत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व, सामाजिक एकोपा आणि लोकसहभागाची परंपरा त्यांनी जाणून घेतली.
महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकारातून महापौर निवास येथे झालेला हा सांस्कृतिक संवाद विविध राज्यांतील युवकांना पुण्याच्या गणेशोत्सवाशी जोडणारा ठरला. प्रदेश, भाषा आणि संस्कृती वेगवेगळी असली तरी गणरायाच्या भक्तीतून संपूर्ण भारत एक असल्याचा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
अशा सांस्कृतिक देवाणघेवाणीतून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला बळ मिळत असून, पुण्याची (Pune News) गणेशोत्सव परंपरा देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचविण्याचा सुंदर प्रयत्न ठरला.






