Varsha Usgaonkar: ‘कौलारू माडी गं…’ गणेशोत्सवानिमित्त वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणेंचा खास व्हिडिओ
Varsha Usgaonkar: वर्षा उसगांवकर व किशोरी शहाणे या दोघीही मराठी बिग बॉसमध्ये झळकल्या होत्या.

Varsha Usgaonkar: अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांनीही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला आहे. दोघींनी घरच्या गणपतीसमोर खास आगरी कोळी गाण्यावर डान्स केला आहे. वर्षा व किशोरी शहाणे यांना एकत्रित पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘कौलारू माडी गं’ गाणे ट्रेडिंगवर आहे. या गाण्यावर वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे व अर्चना नेवरेकर यांनी रील केली. व्हिडीओमध्ये किशोरी शहाणे, वर्षा उसगांवकर व अर्चना नेवरेकर या पारंपरिक साडी आणि दागिन्यांनी नटलेल्या दिसत आहेत.
View this post on Instagram
किशोरी शहाणे या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असून, त्या अनेकदा आपल्या मुलासह रील शेअर करत असतात. आता त्यांनी वर्षा उसगांवकर व अर्चना नेवरेकर यांच्याबरोबर गणेशोत्सवातील खास क्षण शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिघींनी पारंपरिक वेशात केलेलं नृत्य पाहून चाहत्यांच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’ असे कॅप्शन लिहीत तिघींनी आनंदाने गणेशोत्सव साजरा केला आहे. तिघींच्या या रीलवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.
दरम्यान, वर्षा उसगांवकर व किशोरी शहाणे या दोघीही मराठी बिग बॉसमध्ये झळकल्या होत्या. किशोरी शहाणे दुसऱ्या सीझनमध्ये, तर वर्षा उसगांवकर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. ज्यात दोघींनाही प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर दोघी काही मालिकांमध्येही पाहायला मिळाल्या.
हेही वाचा:
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर नवं संकट! नंदीग्रामपाठोपाठ आणखी एका उमेदवाराची माघार





