Pune News : निसर्गाच्या सान्निध्यात कलेचा जल्लोष; ‘झपूर्झा’ म्हणजे कलाप्रेमींचं हक्काचं ठिकाण!
निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेले "झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय" म्हणजे निसर्ग -शांतात -स्वच्छता आणि कलाप्रेमींसाठी मनमुराद आनंद देणारं ठिकाण.

Pune News : निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेले “झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय” म्हणजे निसर्ग -शांतात -स्वच्छता आणि कलाप्रेमींसाठी मनमुराद आनंद देणारं ठिकाण.
बाराहून अधिक दालने अजित गाडगीळ यांच्या संग्रहातील सौंदर्याच्या, कलेच्या विविध आयामांना स्पर्श करून जाणाऱ्या वस्तू,चित्रं ,शिल्पं ,उपकरणं यांनी सजवलेली आहेत.
गतकाळातील सांस्कृतिक वैभवाच्या खुणा जपतानाच त्यांची पुनर्भेट होते. आणि ते पाहताना आपणही आठवणींच्या काळात रमून जातो, भूतकाळात जाऊन नव्याने स्मृतींना उजाळा देतो.
येथील वास्तुरचनादेखील इथल्या सौंदर्यात भर घालतात. आपल्या वैभवशाली परंपरेची-संस्कृतीची ओळख, पुनरुजीवन, तिचा प्रसार ,प्रचार पुढच्या पिढयांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश झपूर्झाचा आहे.
त्याच बरोबर “कला प्रत्येकासाठी” या हेतूने सुरु झालेल्या या प्रकल्पात सर्वाना त्यांच्या मनासारखे -आवडते काही ना काही नक्कीच अनुभवायला येत असते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना भावेल अशा कलाकृती इथे सादर केल्या जातात.
अनुभवी कलाकार इथे त्यांचे प्रयोग -खेळ करतातच पण त्याच बरोबरीने नवीन कलाकारांना देखील त्यांची कला इथे सादर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
अनेक शाळा आणि महाविद्यालये यांनीदेखील सहलीचे ठिकाण म्हणून संग्रहालयाची निवड केल्याचे दिसते. संग्रहालय हे प्रेक्षागृह ,कॉन्फरेन्स रूम अशा सोईंनी आणि अनेकविध कार्यशाळांनी आणि activities नी युक्त आहे.
त्यामुळेच अनेक कंपन्यांनी देखील त्यांच्या परदेशी पाहुण्यांना ,सहकाऱ्यांना संग्रहालयाच्या भेटीला घेऊन येतात. अनेक कंपन्या इथे सेमिनार, कॉन्फरेन्स, मीटिंग आणि ट्रेनिंग सेशन झपूर्झा च्या प्रांगणात आयोजित करतात .
दर शनिवार रविवारी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना मिळते, नृत्य,नाट्य,काव्यवाचन,संगीत मैफिली या रूपाने. दर सहा आठ महिन्यांनी येथील किमान चार दालने बदलली जातात.
नव्या वस्तुंनी नव्या कल्पनांनी सजवली जातात,पुन्हा पुन्हा येणाऱ्या रसिक प्रेक्षकांना कायम नवीन,तरल आणि ताजा अनुभव द्यायचा झपुर्झाचा प्रयत्न असतो. “झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय तुम्हा सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. लवकरच भेट द्या नवीन दलाने आपली वाट पाहत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८५०९९१००८





