Pune News : तणावमुक्त जीवनासाठी डॉ. बी. के. शक्तीराज यांचे व्याख्यान
Pune News : या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आव्हान श्री पूना गुजराती बंधू समाज व जयराज क्लबचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.राजेश शहा यांनी केल आहे.

पुणे : आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात मानवी मन विविध चिंतानी व नकारात्मकतेने ग्रासले आहे. हाच धागा पकडत, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्याल माउंट अबू यांचे ख्यातनाम आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर, विश्वविक्रम धारक व माईंड ट्रेनर डॉ. बी. के. शक्तीराज यांचे विशेष प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
जयराज स्पोर्ट्स कन्व्हेन्शन सेंटर, येथे कोंढवा येथे गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी, संध्याकाळी ६ ते ८ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या सरिता दीदी, सुजाता दीदी यांच्या विशेष प्रमुख उपस्थिती असणार आहे. या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आव्हान श्री पूना गुजराती बंधू समाज व जयराज क्लबचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.राजेश शहा यांनी केल आहे.





