Pune: चार दिवस २० पेक्षा जास्त ट्रेन रद्द

पुणे – रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॉर्ड लाइन येथील कामांसाठी दि. २९ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसाला २० पेक्षा जास्त रेल्वे गाड्या रद्द होणार आहेत. तर, १५ ते २० ट्रेन्सचे मार्ग वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे बदलाची माहिती घेऊन प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
यामध्ये दौंड-इंदौर एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावेल आणि येथूनच सुटेल. पुणे ते दौंड दरम्यान ही ट्रेन रद्द असेल. तर, ३० जुलै रोजी म्हैसूर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस सोलापूर ते शिर्डी दरम्यान रद्द. तसेच, काजिपेट-हडपसर एक्स्प्रेस कुर्डुवाडीपर्यंत धावणार आहे. दि. २९ जुलै रोजी नांदेड-पनवेल, पनवेल-हजूर साहिब नांदेड़, पुणे-सिकंदराबाद-पुणे, पुणे-सोलापूर-पुणे, दौंड-निजामाबाद, सोलापूर-पुणे, पुणे-बारामती-पुणे, पुणे-दौंड मेमू, दौंड-बारामती, सोलापूर-दौंड-सोलापूर, पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
दि. ३० जुलै रोजी रद्द ट्रेन
पुणे-सोलापूर, नांदेड़- पनवेल, पनवेल-नांदेड़, सोलापूर-पुणे, हडपसर-सोलापूर, पुणे-सोलापूर-पुणे, अमरावती-पुणे, दौंड-निजामाबाद, सोलापूर-पुणे, पुणे-दौंड, दौंड-बारामती, हडपसर-दौंड, बारामती-पुणे, पुणे-बारामती, पुणे-दौंड मेमू पैसेंजर, बारामती-दौंड, दौंड-सोलापूर-दौंड, पुणे-दौंड, पुणे-हरंगुळ-पुणे विशेष.
दि. ३१ जुलै रोजी रद्द ट्रेन
पुणे-सोलापूर, नांदेड़-पनवेल, सोलापूर-पुणे, पनवेल- नांदेड़, सिकंदराबाद-एलटीटी दुरंतो, हडपसर-सोलापूर, पुणे-सोलापूर-पुणे, दौंड-निजामाबाद, पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी, पुणे-दौंड, दौंड-बारामती, दौंड-हडपसर, बारामती-पुणे, पुणे-बारामती, पुणे-दौंड मेमू पॅसेंजर, बारामती-दौंड, दौंड-बारामती, पुणे-दौंड-पुणे, बारामती-पुणे, पुणे-हरंगुळ-पुणे, सोलापूर-दौंड-सोलापूर
दि. १ ऑगस्टला रद्द ट्रेन
पुणे-सोलापूर, नांदेड़-पनवेल, सोलापूर-पुणे, एलटीटी-सिकंदराबाद दुरंतो एक्स्प्रेस, पुणे- सिकंदराबाद-पुणे शताब्दी, सोलापूर-पुणे, हडपसर-सोलापूर, पुणे-सोलापूर-पुणे , निजामाबाद-पुणे, सोलापूर-पुणे, दौंड-निज़ामाबाद, पनवेल- नांदेड़ एक्स्प्रेस, पुणे-अमरावती, पुणे-नांदेड़ एक्स्प्रेस, दादर-साईंनगर, अमरावती-पुणे, पुणे-दौंड, दौंड -बारामती, दौंड-हडपसर, बारामती-पुणे, पुणे-बारामती, पुणे-दौंड मेमू, साईंनगर शिर्डी-दादर, पुणे-हरंगुळ-पुणे, सोलापूर-दौंड-सोलापूर डेमू.





