Pune: १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून पावसाळी कामे झालीच नाहीत

पुणे – पावसाळा वाहिन्या सफाइचे काम क्षेत्रिय कार्यालयानी एप्रिलमध्ये सुरू केले होते. या कामांसाठी १५ क्षेत्रिय कार्यालय स्तराव प्रत्येकी स्वंतत्र निविदा काढण्यात आली होती. त्यानंतरही मे महिनाअखेरपर्यंत उपगनरांतील ८४ कि.मी. लांबीच्या पावसाळी गटारांची आणि १४ हजार चेंबरच्या स्वच्छतेचे काम बाकी होते. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र साचलेल्या पाण्यामुळे क्षेत्रिय कार्यालय स्तारावरील कारभारही उघडा पडला आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचू नये, त्याचा त्वरित निचरा व्हावा, यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी वाहिन्या टाकल्या जातात. परंतु, मोठा पाऊस झाला की रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येऊन वाहतुकीचा खोळंबा होतो. पावसाळी वाहिन्यांची, चेंबरची स्वच्छता केल्याचे सांगितले जाते परंतु, प्रत्येक वर्षी पासाळ्यात रस्त्यांवर पाणी होते. आज, झालेल्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी तळी निर्माण झाल्याचा अनुभव उपगगरांतील नागरिकांनी नेहमीप्रमाणे घेतला.





