Pune : क्रिकेट खेळून ‘मनसे’चे आंदोलन

पुणे : कात्रज भागातील हभप पुंडलिक टिळेकर मैदान सुरू करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेमध्ये क्रिकेट खेळून आंदोलन करण्यात आले.
येत्या आठ दिवसांत मैदान सुरू केले नाही तर आयुक्तांच्या दालनात क्रिकेट खेळू, असा इशारा देखील यावेळी बाबर यांनी दिला. शहर संघटक गणेश नाईकवाडे, मनविसे शहराध्यक्ष महेश भोईवार, संतोष वारे, अमित जगताप, निलेश जोरी यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात अनेक क्रीडांगणे महापालिकेच्या ताब्यात आली आहेत. त्या ठिकाणी मद्यापींनी अड्डे मांडले आहेत. एका बाजूला मुलांना खेळण्यासाठी जागा नसताना अशा प्रकारे लाखो रुपये खर्च करून केलेली क्रीडांगणे बंद ठेवली जात आहेत.
त्यामुळे या क्रीडांगणासह शहरातील इतर क्रीडांगणे सुरू केली नाही तर आयुक्त कार्यालयात क्रीकेट खेळणार असल्याचे बाबर यांनी सांगितले.




