Pune : येरवड्यात मायावती यांची उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

विश्रांतवाडी – बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती यांची महाराष्ट्रातील बसपा उमेदवाराच्या प्रचारार्थ फुले, शाहू, आंबेडकरांची जन्मभूमी – कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्र पुण्यात जाहीर सभा दि. 17 नोव्हेंबरला प्रादेशिक मनोरुग्णालय मैदान, ई-कॉमरझोन, आयटी पार्क समोर येरवडा या ठिकाणी दुपारी 12:00 वाजता होणार आहे.
बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र मध्ये 237 ठिकाणी स्वबळावर ताकदीनिशी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवीत आहे. यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत बसपाचे खाते उघडेल व बसपा बॅलन्सिंग पॉवर म्हणून महाराष्ट्रात उभा राहील, असाआमचा विश्वास आहे. अपप्रचारास सडेतोड उत्तर या निवडणुकीने मिळेल, असा प्रयत्न बसपाचा राहणार आहे, असे बसपाचे उमेदवार डॉ. हुलगेश चलवादी यांनी सांगितले.
येरवडा येथे होणाऱ्या सभेस बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षांसोबत बसपाचे राष्ट्रीय कोऑर्डिनेटर आकाश आनंद, बसपाचे राज्यसभेचे खासदार केंद्रीय कोऑर्डिनेटर रामजी गौतम, केंद्रीय कोऑर्डिनेटर महाराष्ट्र प्रभारी नर्मदाप्रसाद अहिरवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एडवोकेट सुनील डोंगरे, उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉ. हुलगेश चलवादी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव काळुराम चौधरी, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुदीप गायकवाड व पुणे जिल्हा प्रभारी मोहम्मद शफी उपस्थित राहणार असल्याची माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप कुसाळे यांनी दिली.





