‘लोकमान्य’तर्फे “अक्षय ठेव” योजना सादर; ग्राहकांचा लक्षणीय प्रतिसाद

पुणे : ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि’तर्फे अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ‘अक्षय’ मुदत ठेव योजना सादर करण्यात आली आहे. निश्चित कालावधीत चांगला परतवा देणारी ही योजना असून या योजनेस ग्राहक-सभासदांचा लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे.
तेरा महिन्यांच्या कालावधीत चांगला परतावा उपलब्ध करून देणारी ही योजना असून या गुंतवणूक योजनेसाठी १० टक्के इतका व्याजदर असणार आहे. तर जेष्ठ नागरिकांसाठी ०.५० टक्के इतका अधिकचा व्याजदर असणार आहे. ग्राहक-सभासद या योजनेत दहा हजार रूपयांची किमान गुंतवणूक करू शकतात.
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर गुंतवणूकीवर चांगला परतावा उपलब्ध करून देणारी ही योजना आहे, असा विश्वास लोकमान्य सोसायटीने व्यक्त केला आहे.
दरम्यान, गुंतवणुकदार घरबसल्या ‘लोकमान्य डिजिटल अँप’च्या माध्यमातून देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. `लोकमान्य सोसायटी`च्या कोणत्याही शाखेत किंवा १८०० २१२ ४०५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ग्राहक-सभासद-गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती `लोकमान्य सोसायटी`तर्फे करण्यात आली आहे.



