PUNE: पुणेकरांनो, चला वाहनांचे हॉर्न एक दिवस बंद ठेवूया…
Updated On:

पुणे – लाइफ सेव्हिंग फाउंडेशन , पुणे वाहतूक पोलीस आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्यावतीने नो हॉकिंग डे (हॉर्न ठेवा एक दिवस बंद) अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने पुण्यामध्ये विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवारी दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर चौकात याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लाईफ सेव्हिंग फाउंडेशनचे देवेंद्र पाठक , हास्ययोग परिवारचे मकरंद टिल्लू , प्रा. पद्माकर पुंडे यांनी दिली. यामध्ये महाविद्यलयीन विद्यार्थी, आयटी कंपन्या, हॉटेल, मॉल्स, तसेच विविध संघटना सहभागी होणार आहेत.





