Pune : बोरे आणि पपईच्या भावात वाढ लिंबाच्या भावात घसरण
Updated On:

पुणे : मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे बोरे, पपई आणि लिंबू वगळता सर्व फळांचे भाव स्थिर आहेत. बोरांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.
त्यामुळे बोरांच्या आणि मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे पपईच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, केवळ लिंबाच्या भावात घसरण झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
मार्केटयार्ड फळबाजारात रविवारी (दि.२) फळबाजारात जुन्या आणि नवीन बहरातील मोसंबी ४० ते ५० टन, संत्रा ५० ते ६० टन, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई ३० ते ४० टेम्पो, लिंबांची सुमारे दीड हजार गोणी, कलिंगड २५ ते ३० टेम्पो, खरबूज ७ ते ८ टेम्पो, चिकू एक हजार बॉक्स, पेरु १०० क्रेट, अननस ६ ट्रक, बोरांची पाचशे गोणी इतकी आवक झाली होती.





