पुणे : शहरातील डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ
Updated On:

पुणे – शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून, डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या डासाच्या अळीची उत्पत्तीस्थाने वाढू देऊ नयेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
ज्यांच्या घरी, आस्थापनांमध्ये, बंगल्यात, सोसायट्यांमध्ये तसेच परिसरात डेंग्यू डासांची उत्पत्ती झाल्याचे आढळले आहे. त्यांच्याकडून महापालिकेने दंड वसूल केला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत या पथकाने 1909 जणांना डेंग्यू डासोत्पत्तीप्रकरणी नोटीस बजावली आहे. वारंवार नोटीस देऊनही त्या ठिकाणी डासोत्पत्ती झाल्याप्रकरणी त्यांच्याकडून 1 लाख 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर, शहरात आतापर्यंत 273 आणि सप्टेंबरमध्ये 77 रुग्ण आढळले, अशी माहिती महापालिकेचे साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.





