पुणे – महापालिकेने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशा सूचना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नेमलेल्या समितीने महापालिकेला दिल्या.
पुणे शहरात पाणीपुरवठा आणि सांडपाणी यावर एकत्रित बसून निर्णय घेण्यासाठी प्राधिकरणाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा,महापालिका, शेतकरीसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यामध्ये महापालिकेच्या हदद्दीतून नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावरून चर्चा झाली. यावेळी महापालिकेने हद्दीत निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या “जायका’सह विविध प्रकल्पांची माहिती दिली.