Pune: वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी, औषधोपचार शिबिर

पुणे – नारायण पेठेतील योगेश शांडिल्य- तिवारी मित्र परिवारातर्फे संतांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी मोफत तपासणी, औषधोपचार शिबिराचे आयोजन केले होते. डॉ. अधीर तांदळे, डाॅ. ज्योती शाळीग्राम, डॉ. सुभाष गुंदेचा, डाॅ. अभिजित बोरा, डाॅ. नीता बोरा यांनी ५०९ रुग्णांची आरोग्य तपासणी केली.
या वारकऱ्यांना नितीन पोरे, धीरज डुंगरवाल यांनी औषधे उपलब्ध करून दिली. तर सुहास बोरावके, रितेश शांडिल्य, गणेश जाधव, कमलाकर बालघरे, सदानंद म्हसवडे, मधूर गेहलोत, राकेश वंजारी यांनी शिबिराचे संयोजन केले. गुडघे, कंबर व पायदुखीच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे डॉ. तांदळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हिमोग्लोबीन कमी असणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय होती.
वारकऱ्यांचा पुढील प्रवास वेदनारहित व सुखकर व्हावा, किंबहुना कोणत्याही आजारामुळे त्यात खंड पडू नये, या उदेशाने गेली सतरा वर्षे या शिबिराचे आयोजन केले जात असल्याचे योगेश शांडिल्य, विशाल सुगंधी यांनी सांगितले. या शिबिराला ह.भ.प. साधवी वैष्णवी सरस्वती, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, भाजप शहर सचिव निलेश कोंढाळकर, दैनिक “प्रभात’चे संपादक अविनाश भट आदी उपस्थित होते.





