Pune Gramin: महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात शरद पवार महिला गटाच्या वतीने निषेध आंदोलन

शिरूर : राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे परंतु दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या महिन्या भरात उरण आणि शिळफाटा येथे महिलांवर अमानुषपणे अत्याचार करून त्यांचा निर्दयपणे खुन करण्यात आल्याचा घटना घडल्या आहेत.
यामुळे राज्यात महिलांची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यभरात निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे आली.
या योजने अंतर्गत राज्यातील पात्र माता भगिनींना दरमहा दरमहा १५०० रूपये देण्यात येणार आहेत. गेल्या दहा वर्षात वाढलेली महागाई वाढलेले गॅस सिलेंडरचे दर यामुळे महिलांना घर खर्च भागवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यावेळी रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी सरकार महिलांना दरमहा १५००रुपये देणार आहे.
त्यामुळे महिलांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे परंतु एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डंका वाजविला जात असताना दुसरीकडे राज्यात लाडक्या बहिणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या महिन्यात उरण आणि शिळफाटा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि राज्यातील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दर्शवनाऱ्या आहेत.
यात नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने निर्दयीपणे पिडितेच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन तिचे हाल हाल करून तिला मारले आणि त्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न करून तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केल्याचे निदर्शनास आले आहे.
तर दुसऱ्या घटनेत बेलापूर येथिल तीस वर्षीय महिला घरगुती भांडण झाल्याने मानसिक शांतता मिळावी म्हणून डायघरजवळील शीळ फाटा येथिल गणेश घोळ मंदिरात गेली होती. येथे मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी त्या महिलेला चहातून गुंगीचे औषध देऊन या महिलेवर आळीपाळीने बलात्कार करत तिचा निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या दोन्ही घटनांमध्ये माणुसकीला काळिमा फासला गेला आहे.
या घटनांमुळे राज्याचे गृह खाते निद्रिस्त असुन राज्यात महिला असुरक्षित असल्याचे जाणवत असून या घटनांमुळे राज्याच्या गृह खात्याचा अब्रु चव्हाट्यावर आली आहे. या दोन्ही घटना अमानवीय असुन निषेधार्ह आहेत या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि निद्रिस्त असलेल्या गृह खात्याला खडबडून जागे करण्यासाठी व घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून घटनेतील पाषाण हृदयाच्या आरोपींना फाशीशी शिक्षा देण्यात यावी असे मनोगत व्यक्त केले.
तसेच महिलांनी या सरकारचे करायचे काय,घोषणा दिल्या,हातात काळ्या फिती बांधून जाहीर निषेध केला. राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे महिलांनी नायब तहसीलदार गोसावी मॅडम यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार उपस्थित होते.
तसेच राणी कर्डिले, डॉं.स्मिता कवाद, गीता आढाव, संगीता शेवाळे, रोहिणी बनकर, ज्योती लोखंडे, शीतल शर्मा, संगीता रोकडे, शशिकला काळे, सविता बोरुडे, कल्पना चांदगुडे, दुर्गा ननवरे, प्रीती बनसोडे, तसेच मुज्जफर कुरेशी, सुरेश पाचर्णे ,रवींद्र खांडरे, अमित शिर्के, सागर नरवडे ,युवराज सोनार, राहील शेख, कलीम सैयद, अर्शद शेख, अक्षय सोनवणे, कुणाल काळे आजी माजी सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.





