रांजणगाव गणपती (वार्ताहर) – गणेगाव खालसा (ता. शिरुर) येथे बुधवारी (दि. १० जुलै) रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहन चालकाने शिक्रापूर-मलठण हद्दीतील कामिनी ओढ्यावरील नवीन पुलाजवळ वाहत्या पाण्यात नायट्रिक अॅसिड सोडल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, या अॅसिडमुळे होणारा पुढील अनर्थ टाळण्यासाठी ओढ्यावरील सर्व बंधारे ढापे टाकून ओढा बंद करण्यात आला आहे. तसेच कोंढापुरी तलावात पाणी जाऊ नये यासाठी अलीकडेच भराव टाकला असुन रसायनयुक्त पाणी व माती एम ई पी एल कंपनीत नेण्यात येणार असल्याचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी यावेळी सांगितले. सदर ओढ्यात नायट्रीक अॅसिड टाकल्याने व परिसरात उग्र स्वरूपाचा दर्प पसरल्याची घटना घडल्याने तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी अधिकारी व पदाधिका-यांसह घटना स्थळांची पाहणी केली. तसेच योग्य त्या उपाय योजना देखील सुरु केल्या आहेत. ज्या ठिकाणी हे केमिकल सोडण्यात आले येथील पाणी तर खराब झाले असून, परिसरातील गवत व झाडे देखील जळुन गेली आहेत. या घटनेची पाहणी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के साहेब, गटविकास अधिकारी महेश डोके व मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी केली. यावेळी सदर घटनेतील दोषींचा तपास करुन कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी केली. याप्रसंगी दत्तात्रय कदम, पाचुंदकर पाटील, सरपंच नंदा ढसाळ, माणिकराव बांगर, सुहास बांगर, अभिजीत तांबे, गणेश ढोकले, दत्तात्रय लांडे, ज्ञानेश्वर वायदंडे, स्वाती टावरे, गणेश भिगोत, श्रीकांत झांजे, श्रीकांत वाव्हळ आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे देखील वाचा…! शिरुर येथील कामिनी ओढ्यात अज्ञात व्यक्तीने टाकले नायट्रिक ॲसिड