Pune Gramin: मुळशीत पावसाचा हाहाकार ! धरणातून विसर्ग सोडण्यापूर्वी नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा
Updated On:

Pune Gramin : राज्यातील अनेक जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून तुफान पाऊस होत आहे. राज्यातील अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली असून पुणे, मुंबई या शहरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
मुळशी धरण परिसरात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून आज सायंकाळी ५ वाजता धरणाच्या सांडव्यावरून ५ हजार ते ७ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.
नदी पात्रात ,पाऊस चालू-वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. असा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.





