खोडद : कर्करोग या आजाराला घाबरून न जाता वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन योग्य वेळी शारीरीक तपासणी केल्या तर उपचाराच्या साह्याने या आजारावर मात करता येते असे प्रतिपादन डॉ प्रदिप जोशी यांनी व्यक्त केले. मांजरवाडी ता. जुन्नर येथे जनकल्याण फांऊंडेशन मांजरवाडी यांचे वतीने अशोक मुळे यांचे स्मरणार्थ डॉ प्रदिप जोशी व रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांचे संयुक्त विद्यमाने दि. १४ रोजी श्री स्वामी समर्थ कॉंप्लेस्क्स जनकल्याण सभागृह येथे आयोजित मोफत कॅन्सर, पोट, ह्रदय, शुगर, बीपी तपासणी शिबीर आयोजित केले होते. यावेळी डॉ जोशी शिबिरास उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी रोटरी क्लब हायवे अध्यक्ष डॉ उत्तम घोरपडे यांनी मानवी शरीरात वाढते आजार याला आपला आहार तसेच व्यसन देखील जबाबदार असल्याचे सांगितले. या शिबिरात एकुण २३४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ११४ रुग्णांची कॅन्सर मार्कर तपासणी रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्यात आली सर्जन डॉ प्रदिप जोशी यांचे माध्यमातून १६ रुग्णांचा ईसीजी तपासणी, १२५ रुग्णांची शुगर व बीपी तपासणी करण्यात आली तर १२० रुग्णांची पोट, सांधे दुखी, अशक्तपणा, शरीरावर असणाऱ्या गाठी यांची तपासणी करण्यात आली व जनकल्याण फाऊंडेशन, पतसंस्था, दूधसंस्था, वाचनालय, शेतकरी संस्था, केपीएल ग्रुप यांचे मार्फत गोळ्या व औषध वाटप करण्यात आले.