Pune Ganeshotsav 2026 : गणपतीच्या खरेदीसाठी पुण्यातलं बेस्ट मार्केट कोणतं? फुलं, तोरणं अन् रोषणाईपर्यंत सर्व काही मिळणार; पाहा स्पेशल VIDEO
पुणे शहरात सणासुदीच्या काळात या वस्तूंच्या खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी तुळशीबाग, मंडई, बुधवार पेठ, रविवार पेठ आणि शुक्रवार पेठ हा मध्यवर्ती भाग खरेदीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो.

Pune Ganeshotsav 2026 : गणेशोत्सव म्हटलं की घराची आकर्षक सजावट, गणरायासाठी सुंदर मखर, फुलांच्या माळा, आकर्षक तोरणं, रोषणाई आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी आलीच. पुणे शहरात सणासुदीच्या काळात या वस्तूंच्या खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी तुळशीबाग, मंडई, बुधवार पेठ, रविवार पेठ आणि शुक्रवार पेठ हा मध्यवर्ती भाग खरेदीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. या परिसरात पूजेच्या साहित्यापासून घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या छोट्या-मोठ्या वस्तूंपर्यंत जवळपास सर्व काही सहज मिळते.
‘तुळशीबाग’ हा पूजा साहित्य आणि सणासुदीच्या खरेदीसाठी पुण्यातील प्रसिद्ध परिसर आहे. बुधवार पेठेतील तुळशीबाग परिसरात पूजेच्या थाळ्या, समई, दिवे, अगरबत्ती, धूप, कापसाच्या वाती, हळद-कुंकू, देवांच्या मूर्ती यासह विविध धार्मिक वस्तूंची अनेक दुकाने आहेत. त्याचबरोबर कृत्रिम फुलांच्या माळा, तोरणं, वॉल हँगिंग, रंगोळी आणि गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तूही येथे मिळतात.
View this post on Instagram
‘मंडई’ परिसर हा देखील सणासुदीच्या खरेदीसाठी महत्त्वाचा भाग आहे. फळं, नारळ, विविध पूजेच्या वस्तू आणि नैवेद्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची खरेदी येथे करता येते. मंडई परिसरातून तुळशीबाग आणि लक्ष्मी रोडकडे सहज जाता येत असल्याने एकाच फेरीत अनेक प्रकारची खरेदी पूर्ण करता येते.
View this post on Instagram
‘रविवार पेठ’ (बोहरी आळी) हा सजावटीच्या वस्तू आणि डेकोरेशन मटेरियलसाठी उपयुक्त पर्याय आहे. येथे कृत्रिम फुलांच्या माळा, कागदी फुलं, तोरणं, मखरासाठी लागणारे साहित्य, वॉल हँगिंग आणि विविध प्रकारच्या LED लाईट्स मिळतात. गणेशोत्सवातील घरगुती सजावटीपासून मंडप सजावटीपर्यंत विविध वस्तूंचे पर्याय या भागात पाहायला मिळतात.
View this post on Instagram
शुक्रवार पेठ परिसरात क्राफ्ट आणि सजावटीच्या साहित्याची दुकाने आहेत. लेस, विविध प्रकारचे क्राफ्ट मटेरियल, सजावटीच्या वस्तू आणि मखर किंवा मंडप सजावटीसाठी लागणारे साहित्य येथे मिळू शकते.
View this post on Instagram
पूजेच्या वस्तूंसोबतच नैवेद्यासाठी लागणारी भांडी आणि पूजेची धातूची भांडी घ्यायची असल्यास तुळशीबाग परिसरातील मेटल आणि भांडी विक्रेत्यांकडे चांगले पर्याय मिळतात. पूजा थाळी, पंचपात्र, समई, दिवे तसेच नैवेद्य ठेवण्यासाठी लागणारी विविध भांडी येथे उपलब्ध असतात.
View this post on Instagram
दरम्यान, ताजी फुलं आणि फुलांच्या माळा मोठ्या प्रमाणात खरेदी करायच्या असतील तर गुलटेकडी येथील मार्केट यार्ड फूल बाजार हा महत्त्वाचा पर्याय आहे. येथे झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा यांसह विविध प्रकारची ताजी फुलं आणि फुलांच्या माळा मिळतात.






