Pune Fuel Shortage पुण्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा? पंपांवर लांबच लांब रांगा; जाणून घ्या काय आहे सत्य
Pune Fuel Shortage : पेट्रोल-डिझेलच्या टंचाईच्या अफवा सोशल मीडियावरून पसरल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Pune Fuel Shortage – जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलच्या टंचाईच्या अफवा सोशल मीडियावरून पसरल्याने पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहर आणि ग्रामीण भागात काही पेट्रोल पंप बंद असल्याने अफवांमध्ये भर पडली आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचा साठा सरप्लस असून, कोणतीही टंचाई नसल्याचे ऑल इंडिया पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे सदस्य अली दारुवाला यांनी स्पष्ट केले आहे.
६५ लाख सिलिंडरचा साठा असलेले चीनला निघालेले एक जहाज चेन्नईला उतरले आहे. येत्या काही दिवसांत भारत सरकारने सांगितल्याप्रमाणे एलपीजी, सीएनजी, एलएनजी सर्व भेटणार आहे. देशाकडे पेट्रोल आणि डिझेल सरप्लस आहे, टंचाई कोठेच नाही. फक्त वाहतूक चार्ज वाढल्याने शासनाला एका लिटरमागे ५० रुपये तोटा सहन करावा लागत आहे.
ग्रामीण भागात पेट्रोल पंप बंद आहेत. मात्र, त्यामागे टंचाई हे कारण नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी क्रेडिट देणे बंद केले आहे. त्यांच्याकडून आठवडा ते पंधरा दिवस क्रेडिट देणे सुरू होते. त्यांना मागील उधारी क्लिअर करण्यास आणि आज लागणाऱ्या मालाचे पैसे आगाऊ देण्यास सांगण्यात आले आहे. पेट्रोल पंप काही हजार लिटर पेट्रोल घेतात. त्यामुळे त्यांना एवढी रक्कम आगाऊ देणे शक्य नाही, त्यातच रामनवमीमुळे काही बँका बंद आहेत. याचा परिणाम म्हणून काही पंप बंद आहेत.
पेट्रोल पंपांचे क्रेडिट बंद
टिंगरेनगर येथील श्री साई कृपा सर्व्हिस पेट्रोलपंपाचे मालक अजय सावंत यांनी सांगितले, की पेट्रोलियम कंपन्या आम्हाला क्रेडिट देत होत्या. त्यामुळे आम्ही उद्योग, व्यवसाय, मॉल, थिएटर आदींसारख्या ग्राहकांना क्रेडिटवर बल्कने माल देऊ शकत होतो. आता आम्हाला क्रेडिट बंद झाल्याने आमच्या ग्राहकांनाही उधारीवर माल देऊ शकत नाही





