पुणे – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी या उपक्रमाची माहिती दिली. रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात आहे. यंदाही २८ ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते संध्याकाळी पाच या वेळीत हे शिबिर होणार आहे. यामध्ये सीबीसी, कोलेस्टोरॉल, क्रिएटिनिन, एसजीओटी, एसजीपीटी, आरबीएस, ब्लड, युरिन, बिलिरुबिन अशा तपासण्या होणार आहेत. त्याचा रिपोर्ट मोबालवर देण्यात येणार आहे. गणेशभक्त थेट आरोग्य शिबिरस्थळी नाव नोंदवून तपासणी करू शकतात. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक – https://bit.ly/Aarogyashibir गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविक-भक्तांसाठीही चांगले आरोग्य लाभावे, या हेतूने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाउंडेशन ने अध्यात्मिक उत्सवात आरोग्योत्सवाचा जागर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. गणेश भक्तांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. – पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट