Pune : १० हजार महिलांसाठी चारचाकी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

पुणे – नऱ्हे, धायरी व वडगाव बुद्रुक परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी भव्य चारचाकी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत तब्बल १० हजार महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी नगरसेवक हरिदास चरवड यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खडकवासल्याचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, मंडलाध्यक्ष यशवंत लायगुडे, मंडल सरचिटणीस शहाजी वांजळे, भाजप युवा मोर्चाचे सारंग नवले, जिल्हा उपाध्यक्ष अनिल मते, सागर भूमकर, शहर उपाध्यक्ष सचिन मोरे, संदिप चरवड, रमेश गायकवाड, सुहास पवार, गजानन सरनाईक, पृथ्वीराज परदेशी, प्रकाश चरवड, चंद्रकांत पवळे, केदार जाधव, संग्राम पवार, सुरेश कोळेकर, सुदाम कोळेकर, संजीवनी मुंदडा, साई यात्रा प्रतिष्ठानच्या पूनमताई चरवड, साई पवार, यश चरवड आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामुळे महिलांना वाहन चालविण्याबरोबरच आत्मविश्वास, स्वावलंबन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मत यावेळी आमदार तापकीर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो महिला व नागरिक उपस्थित होते.





