Pune : आस्मि विचार मंचतर्फे बार कौन्सिल सदस्यांचा सन्मान सोहळा
Pune : आस्मि विचार मंच, शिवाजीनगर यांच्या वतीने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा (टर्म २०२६-२०३१) च्या नवनिर्वाचित सदस्यांसह निवडणुकीत सहभाग नोंदविणाऱ्या पुण्यातील उमेदवारांचा सत्कार समारंभ नुकताच डेक्कन जिमखाना येथील पी. वाय. सी. हिंदू जिमखानाच्या 'द टेरेस हॉल'मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Pune : आस्मि विचार मंच, शिवाजीनगर यांच्या वतीने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा (टर्म २०२६-२०३१) च्या नवनिर्वाचित सदस्यांसह निवडणुकीत सहभाग नोंदविणाऱ्या पुण्यातील उमेदवारांचा सत्कार समारंभ नुकताच डेक्कन जिमखाना येथील पी. वाय. सी. हिंदू जिमखानाच्या ‘द टेरेस हॉल’मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
ज्येष्ठ विधिज्ञ तथा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष व आयएलएस लॉ कॉलेजचे अध्यक्ष अॅड. श्रीकांत व्ही. कानेटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. काळुराम भुजबळ, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, विविध बार असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञ तसेच मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आस्मि विचार मंचाचे अॅड. रविंद्र शिंदे यांनी स्वागत करून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. वकिलांमधील एकात्मता, सामूहिक नेतृत्व, विधी व्यवसायाची उन्नती, नवोदित व महिला वकिलांचे सक्षमीकरण, भारतीय राज्यघटनेतील मूल्यांचा प्रसार तसेच वकिलांच्या हितासाठी सामूहिकपणे कार्य करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा वर निवडून आलेले अॅड. गणेश शिरसाट, अॅड. राजेंद्र उमाप, अॅड. विठ्ठल कोंडे-देशमुख, अॅड. राजेंद्र अनुभुळे, अॅड. अहमदखान पठाण, अॅड. रंजना भोसले, अॅड. माधवी पोतदार आणि अॅड. विकास ढगे-पाटील यांचा शाल, सन्मानचिन्ह व तुळशीचे रोप देऊन गौरव करण्यात आला.
तसेच निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल अॅड. श्रीकांत आगस्ते, अॅड. वनमाला अनुसे, अॅड. जयश्री बिडकर चौधरी, अॅड. अमेय देशपांडे, अॅड. नंदकिशोर गायकवाड, अॅड. प्रतिभा घोरपडे, अॅड. संतोष जाधव, अॅड. औदुंबर खुने-पाटील, अॅड. सुप्रिया कोठारी, अॅड. जयश्री कुटे, अॅड. सुषमा मोकाशे, अॅड. प्रवीण नलावडे, अॅड. सागर नेवसे, अॅड. रूपाली पाटील, अॅड. पांडुरंग साळुंखे, अॅड. सदाखातून शेख, अॅड. शाहेद अख्तर शेख आणि अॅड. राणी सोनवणे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना नवनिर्वाचित सदस्यांनी बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा, न्यायव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा आणि वकिलांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
अध्यक्षीय समारोपात अॅड. श्रीकांत व्ही. कानेटकर यांनी वकिली व्यवसायातील मूल्ये, व्यावसायिक नीतिमत्ता, संघटनशक्ती आणि तरुण वकिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. बार आणि बेंच यांच्यातील सुसंवाद, न्यायव्यवस्थेवरील विश्वास तसेच विधिज्ञांच्या एकजुटीची आवश्यकता त्यांनी विशद केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अॅड. रविंद्र शिंदे, अॅड. रोहित देशपांडे, अॅड. विजय लिमये, अॅड. सोमनाथ हरपुडे, अॅड. राजेंद्र नांगरे, अॅड. विजयकुमार ढाकणे, अॅड. जगदीश अगरवाल, अॅड. मंगेश शहा, अॅड. प्रदीप यादव, अॅड. राहुल गवळी, अॅड. राहुल रिसबूड, अॅड. अक्षय हेंद्रे, अॅड. सुवर्णा शिंदे, अॅड. राणी ढाकणे, अॅड. शारदा पाटील, अॅड. मिखिल चाटे, अॅड. संतोष खामकर, अॅड. राम भुजबळ, अॅड. विजयराज दरेकर, अॅड. ओम नांगरे आणि अॅड. सागर भंडारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा देखणा व संस्मरणीय सोहळा वकिलांमधील ऐक्य, परस्पर सन्मान आणि वकिलहितासाठी सामूहिकपणे कार्य करण्याच्या भावनेचे प्रतीक ठरला. उपस्थितांनी आस्मि विचार मंचाच्या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.





