Pune News : पत्नीची सरकारी नोकरी ठरली घटस्फोटाचे कारण; पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात विदारक शेवट
Pune News : पुण्यात एक अत्यंत धक्कादायक आणि चकित करणारी कायदेशीर घटना समोर आली आहे, जिथे लग्नानंतर अवघ्या एका महिन्याच्या आत पत्नीला लागलेली सरकारी नोकरी थेट घटस्फोटाचे कारण ठरली आहे.

Pune News : सरकारी नोकरी मिळविणे अलिकडे अवघड बनले आहे. परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरी मिळविणे, खुप आनंदाची बाब आहे. मात्र, एका प्रकरणात लग्नानंतर एक महिन्याच्या आत पत्नीला लागलेली सरकारी नोकरी घटस्फोटाचे कारण ठरले आहे. (Pune News)
तिच्या अपेक्षा उंचावल्याने दोघातील संवाद तुटला. पतीने क्रुरतेच्या आधारावर दाखल केलेला दावा परस्पर संमतीने घटस्फोटात रुपांतरीत होऊन निकाली निघाला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के. व्ही. ठाकुर यांच्या न्यायालयात हा निकाल झाला. या प्रकरणात पतीच्या वतीने ॲड. खंडेराव टाचले यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. आकाश बिराजदार यांनी सहकार्य केले. (Pune News)
माधव (वय ३२) आणि माधवी (वय ३०) (दोघांची नावे बदलली आहेत) हे दोघेही मूळचे विदर्भातील आहे. माधव पुणे येथे खासगी नोकरी करतो. पारंपारिक पध्दतीने पाहणी करून मे २०२३ मध्ये दोघांचा विवाह झाला. ती पुण्यात आली. संसार सुरळीत सुरू झाला. (Pune News)
लग्नाला एक महिना होण्याच्या आतच लग्नापूर्वी दिलेल्या सरकारी नोकरीच्या परीक्षेत तिला यश आले. ती विदर्भात कामावर रुजू झाली. नोकरीनंतर तिच्या अपेक्षा वाढल्या. तिने पती आणि सासरच्या लोकाकडील संपर्क कमी केला. (Pune News)
या कारणाला कंटाळून पतीने लग्नानंतर २ वर्ष ४ महिन्यांनी येथील कौटुंबिक न्यायालयात क्रुरतेच्या आधारवर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यामध्ये ती हजर झाली. तिच्या वतीने ॲड. महात्मे यांनी काम पाहिले. समुपदेशकाने केलेल्या समुपदेशात दोघे आता एकत्र येणे शक्य नसल्याचे निष्पन्न झाले. (Pune News)
परस्पर घटस्फोट घेण्यास ती तयार झाली. त्यानुसार दोघांचा घटस्फोट झाला. लग्नातील सर्व स्त्रीधन पत्नीला देण्यात आले. तिने पोटगीचे सर्व हक्क सोडून दिले. (Pune News)
दोघे दोन वर्षांहून अधिक काळापासून वेगळे राहत होते. दोघे आता एकत्र येणे शक्य नव्हते. त्यामुळे न्यायालयाने परस्पर संमतीने घटस्फोट मंजुर केला आहे. या निर्णयामुळे वेळ, पैशाची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.
ॲड. खंडेराव टाचले, पतीचे वकील





