Pune : बनावट भरतीप्रकरण; महावितरणची तक्रार
Updated On:

पुणे : सायबर गुन्हेगारांनी महावितरणची बनावट वेबसाइट बनवून नोकर भरतीची जाहिरात केल्याबद्दल महावितरणने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केली आहे, तसेच नागरिकांनी या बनावट जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.
फसवणूक करण्याच्या उद्देशाने सायबर गुन्हेगारांनी www.mahavitaranmaharashtra.com ही बनावट वेबसाइट तयार करून यात शिपाई, वॉचमन, वाहतूक कामगार व सफाई कामगार अशा पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या संकेतस्थळाशी महावितरणचा काहीही संबंध नसल्याचे महावितरणने स्पष्ट करून सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दिली आहे.





