Pune : अल्पवयीनावर शस्त्राने वार अकरा जणांविरुद्ध गु्न्हा
Updated On:

पुणे : आपापसातील वादातून एका अल्पवयीन मुलावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्य कैलास गोयर (वय १७, रा. खडकी बाजार) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्य आणि आरोपींचा वाद झाला होता.
वादातून रविवारी (१६ मार्च) आरोपींनी खडकीतील महादेववाडी परिसरात लक्ष्यला नेले. दाट झाडीत त्याला डांबून ठेवले. त्याला बेदम मारहाण करुन शस्त्राने वार केले.
आमच्या नादाला लागला तर, गंभीर परिणाम होतील, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.





