PUNE: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीचा जागर

पुणे – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दहा मशाली पेटवून त्यांच्या स्मृतिचा जागर “अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी केला. यावेळी अभिवादन गीते म्हणत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यात आले.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्ट रोजी 10 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे राज्य पातळीवर आज आणि उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ज्या ठिकाणी डॉ. दाभोळकर यांची हत्या झाली, त्या ठिकाणी त्यांच्या स्मृतिचा जागर करण्यात आला. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी मारेकरी सापडले, परंतु मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. त्याचा निषेधही यावेळी करण्यात आला. कार्यकर्त्यांनी भर पावसात अभिवादन गीत सादर केली.





