Pune: अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी खाल्ले; वैकुंठ स्मशानभूमीतील संतापजनक प्रकार

पुणे – शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी सकाळी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तुकडे पळवून खाल्ले आहेत. या गंभीर प्रकारामुळे पुण्यातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
Pune: अर्धवट जळलेल्या मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी पळवून खाल्ले; वैकुंठ स्मशानभूमीतील संतापजनक प्रकार pic.twitter.com/Zi79OpgEnt
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) January 8, 2025
दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमित अंत्यविधी केले जातात. पुणे शहरात 29 स्मशानभूमी आहे. त्यामध्ये वैकुंठ स्मशानभूमी सर्वात मोठी असून, तेथे सर्वात जास्त पार्थिवांचे दहन केले जाते.





