Pune : श्वान सतत दोन दिवस ओरडत होते; मालकाने सीसीटीव्ही पाहताच बसला धक्का

पुणे : परगावी गेलेल्या घरमालकाला शेजारच्या महिलेने त्याचे पाळीव श्वान सतत दोन दिवस ओरडत असल्याची माहिती दिली. यामुळे त्याने मोबाइलमध्ये घराच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्याला एक तरुण ग्रील तोडून पार्किंगमध्ये आल्याचे दिसला.
यानंतर गावाहून परतल्यावर घरमालकाने संबंधीत तरूणाला जाब विचारताच घडलेल्या प्रकाराचा त्यांना धक्काच बसला. याप्रकरणी त्यांनी काळे पडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन पोलिसांनी त्यांच्या शेजारील सोसायटीत राहणार्या एका २० वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हांडेवाडी येथील फिर्यादी (वय ४१) एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात. वर्क फ्रॉम होम असल्याने ते मूळ गावी गेले होते. गावी जाण्यापूर्वी पार्किंगच्या जागेत त्यांनी पाळीव लॅब्रेडॉर जातीच्या श्वानाला ठेवले तसेच शेजारी राहणार्यांना श्वानास खाण्या पिण्याच्या वस्तू देण्यासाठी सांगितले.
त्यानंतर तीन दिवसांनी शेजारच्यांनी फोन करुन फिर्यादीला श्वान सतत ओरडत असल्याचे सांगितले. यामुळे फिर्यादीने मोबाइलमध्ये सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता शेजारील फॅक्टरीतील एक तरुण रात्री साडेअकरा वाजता भिंतीवरील ग्रील तोडून पार्किगमध्ये आल्याचे तसेच श्वानाला नेत असल्याचे दिसून आला.
गावाहून परतल्यानंतर फिर्यादीने तरुणाला याबाबत विचारले असता श्वानाशी अनैसर्गिक संबंध केल्याचे त्याने सांगितले. हे एकताच फिर्यादीला धक्काच बसला, याबाबत त्यांनी थेट काळे पडळ पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी संबंधीत तरुणाला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करीत आहेत.





