पुणे जिल्हा : नेव्हीमध्ये कामाला लावण्याचे अमिष दाखवून तरुणाची फसवणूक

एजंटला अटक : दोन लाख रुपये घेतले
नारायणगाव – मर्चंट नेव्हीमध्ये कामाला लावून देतो असे आमिष दाखवून तरुणाकडून पैसे घेऊन फसवणूक करणार्या एजंटला नारायणगाव (ता. जुन्नर) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सुरू असल्याचे सहायक निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले.
निखिल राजू मोरे (वय 26 रा. वारुळवाडी ता.जुन्नर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या एजंटचे नाव आझे. ऋतिक ज्ञानेश्वर गोंधळी (वय 22 रा. वारूळवाडी ता.जुन्नर) यांना परदेशात जहाजावर चांगली नोकरी लावतो असे अमिष दाखवून एजंट मोरने दोन लाख रुपये घेतले.
आणि ऋतिक गोंधळी यांना मलेशियात धोकादायक जहाजावर पाठवून मृत्यूला कारणीभूत झाले असल्याची तक्रार मयत गोंधळी याचे वडील ज्ञानेश्वर गोविंद गोंधळी, (वय 56) यांनी फिर्यादीत नमूद केले आहेह्मयत ऋतिक गोंधळी ची फसवणूक करून एजंट निखिल मोरे फरार झाला होता. पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून एजंटला ताब्यात घेतले आहे.
नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, गोविंद केंद्रे यांनी केली.





