पुणे जिल्हा : होय ! मी भोर मतदारसंघात करूनच दाखवलं !!

आमदार संग्राम थोपटे यांचे विरोधकांना प्रत्युतर
भोर – विरोधकांना माझ्यावर टीका केल्याशिवाय झोपच लागत नाह. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना पाच वर्षात त्यांनी केलेल्या काही महत्वाच्या कामांचा उल्लेख करुन विरोधकांना खडेबोलच सुनावले. होय, मी हे करुनच दाखवले आहे, असे महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार संग्राम थोपटे यांनी अभिमानाने ठणकावून सांगितले. माझे ध्येय जनतेच्या हितासाठी आहे. मी तो प्रामाणिकपणे पूर्ण केला आहे. यापुढेही करीत राहिन, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भोर विधानसभा मतदारसंंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून गेल्या २२ दिवसांत त्यांनी संपूर्ण मतदारसंघातील गावागावात प्रत्यक्ष भेट देवून मतदारांशी संवाद साधला आहे. दरम्यान त्यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा आढावा घेवून जनतेसमोर सादर केला. त्यांचा प्रचार आता अंतिम टप्यात आला असताना त्यांच्याशी भोर तालुक्याचे पूर्व भागातील भोंगवली या गावातील प्रचार दौरा संपवून परत येत असताना संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार थोपटे म्हणाले की, शिंदेवाडी फाटा (ता. खंडाळा) ते भोर तालुक्यातील वरंधा घाटातील महाड हद्दीपर्यंतच्या ५७.४५ किलोमीटर लांबीच्या कॉक्रीट रस्त्याच्या कामासाठी ७२३ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. कापूरहोळ भोर- मांढरदेवी ते सुरूर फाट्यापर्यंत दोनपदरी ५४ किलोमीटर रस्त्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. यासाठी २७६ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
राजगड तालुक्यातील भोरडी ते महाड तालुक्यातील शेवते दरम्यान १८ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ३० कोटी रूपये मंजूर करून आणले.
राजमाता सईबाई यांच्या पाल खुर्द (ता. राजगड) येथील स्मृतीस्थळाच्या विकास आराखड्यासाठी ७३ कोटी रूपयांचा प्रस्ताव सादर करून, त्यातील २१ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी आणली आहे.
थोपटे म्हणाले की, राजगड, तोरणा किल्ल्यावर पर्यटकांच्या सेवा- सुविधांसाठी ३३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका करण्यामध्ये यश आले आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १०४ कोटी तर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ६८ कोटींचा निधी आणून रस्त्यांचे जाळे विणले आहे. प्रधानमंत्री आवास योजना (पीएमआरडीए) अंतर्गत एकूण ४४२० घरकुले मंजूर केली आहेत. मतदारसंघात सुसज्जन प्रशासकीय इमारतीसाठी ६५ कोटींचा निधी आणला आहे. वेल्ह्यात ३ कोटी ४२ लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक पोलीस ठाण्याची इमारत उभारली आहे.
विधानसभा मतदारसंघामध्ये तलाठी कार्यालये व मंडल कार्यालयांच्या सुसज्ज इमारतीसाठी १७ कोटींचा निधी मंजूर.
आमदार डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत ४३ कोटी ५५ लाख तर आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ३५ कोटींची विकासकामे केली.
विशेष दुरुस्तीअंतर्गत ६५ कोटी ८७ लाख, ग्रामविकास विभाग अंतर्गत १५ कोटी ६६ लाख तर नाबार्ड अंतर्गत ६ कोटी ३० लाखांचा निधी आणून मतदारसंघात भरीव स्वरूपाची कामे केली आहेत.
कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून अनेक गावे हिरवीगार झाली आहेत. त्यातील निवडक गावे: हरिश्चंद्री (एक कोटी ७४ लाख), कांजळे (एक कोटी ५२ लाख, वेल्हे (एक कोटी ७६ लाख), कोदवडी (एक कोटी ५९ लाख), हिरपोडी (एक कोटी ५३ लाख), सोंड सरपाले (एक कोटी ६८ लाख, घावर (एक कोटी ११ लाख).
११११ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार
भोर शहरासाठी ९३ कोटी २८ लाखांचा निधी आणून, विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. नीरा देवघर प्रकल्पांतर्गत असलेल्या बंद पाईपलाईनद्वारे होणाऱ्या डाव्या कालव्याच्या कामाला २८ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या कालव्याची लांबी सुमारे १८ किलोमीटर असून १७ गावांतील ११११ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. म्हसर बुद्रुक, म्हसर खुर्द, निगुडघर, करंजगाव, आपटी, नांदगाव, वाठार, पिसावरे, महुडे बुद्रुक महुडे खुर्द ब्राम्हणधर, नांद, शिंद, गवडी, किवत, भोलावडे आदी गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. भोर, राजगड तालुक्यातील जलसंधारणाच्या सतरा प्रकल्पांसाठी ६७ कोटी ७४ हजार रूपयांचा निधी आणला आहे.
लघुपाटबंधारे तलाव बांधून परिसराचा कायापालट
जलक्रांतीतून प्रगत करण्याचा निर्धार केला आहे. कोर्ले – व्याहाळी येथे २३ कोटी १० लाख रूपये खर्चुन लघुपाटबंधारे तलाव बांधला आहे तर वरोती येथे २९ कोटी ५८ लाख रूपयांचा अशाच पद्धतीचा तलाव बांधला आहे. गेटवन साठवण बंधाऱ्याद्वारे शेती हिरवीगार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील निवडक गावे हरिश्चंद्री ( क्र.१६७ लाख ५७ हजार, क्र. २३१ लाख ४३ हजार), अंगसुळे (३३ लाख ३५ हजार), देगाव कुंडीचा ओढा (३२ लाख ९ हजार), देगाव गाढव मळा (३३ लाख ७२ हजार), वेल्हे पंचायत समितीजवळ (५१ लाख ५२ हजार), चिरमोडी (८२ लाख ८२ हजार), कोळंबी (३८ लासा ३८ हजार)/ वाजेघर, वांगणी व शिवगंगा उपसा सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. धोम बलकवडी प्रकल्पांतर्गत टिटेघर, कोर्ले, वडतुंबी उपसा योजनेच्या कामास प्रारंभ झाला आहे. यासाठी तीन कोटी ६१ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. योजनेमुळे ३०२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
पुर्नवसित गावठाणांना कोट्यवधी रुपयांचा निधी
भाटघर व वीर प्रकल्पामुळे पुर्नवसित गावठाणांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. PMRDA घरकुले ४४२० रस्ते निधी ६८ कोटी आहे. ८९ तलाठी कार्यालय व २४ मंडल अधिकारी कार्यालय याकरिता १ कोटी निधी खर्च केला असल्याची माहिती आमदार थोपटे यांनी दिली.





