पुणे जिल्हा : महिलांनी व्यवसायभिमुखता जोपासून आत्मनिर्भर व्हावे

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचे प्रतिपादन
वाघोली : महिलांनी व्यवसायभिमुखता जोपासून आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते प्रो.संगीता कोलते यांच्या Mordern Soul या शॉप चे उद्घाटन करण्यात आले.त्या वेळी चाकणकर बोलत होत्या.
याप्रसंगी माजी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष नीता गलांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामभाऊ दाभाडे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील,
नगरसेविका सुमन पठारे, नगरसेविका संजीला पठारे, माजी सदस्य सुनंदा दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य वंदना दाभाडे, तेजस्वीनी संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता कटके, आव्हाळवाडी सरपंच ललिता आव्हाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.





