पुणे जिल्हा : कोरेगाव मूळमधून महिला बेपत्ता

उरुळी कांचन – कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथे कामाला जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेली २९ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पतीने पत्नी बेपात्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
अनिता गजानन देशमुख (वय २९, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती गजानन राजाभाऊ देशमुख (वय – ४०, रा. सदर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ११) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास, ही महिला कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्द्दीत असलेल्या एका ज्यूस कंपनीत कामाला जाते. असे सांगून निघून गेली आहे. ती अद्यापपर्यंत घरी आली नाही.
अनिता ही उदय बाळासाहेब शिंदे (रा. तांबेवस्ती, उरूळी कांचन ता. हवेली) यांच्यासोबत गेल्याचा संशय पती गजानन यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, उरुळी कांचन पोलिसांनी पत्नी अनिताचा शोध घ्यावा. अशी फिर्याद पती गजाजन यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिली आहे. तपास महिला पोलीस हवालदार भुजबळ करीत आहेत.





