पारगाव : मी रावणगाव येथे प्रचार सभेत सहभागी झालो होतो. यावेळी आमदार राहुल कुल यांनी चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रामाणिकपणे काम केले आहे. त्याची परतफेड म्हणून आम्ही आयुष्यात प्रथमच भाजपाचे काम करणार आहोत, दौंड शुगरचे संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी सांगितले. दौंड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी समोरच्या उमेदवाराचे काम करीत आहेत. त्यांचे निलंबन केले जाईल. या निवडणुकीमध्ये महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय रमेश थोरात यांचे कार्यकर्ते घेत आहेत. रमेश थोरात यांच्यामुळे वीरधवल जगदाळे यांना जिल्हा परिषदचे सभापती पद मिळू शकले नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. गेल्या २ वर्षांमध्ये दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे २ वेळा विभाजन झाले. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले रमेश थोरात हे पक्ष म्हणून नव्हे तर गट म्हणून बाहेर गेलेले आहेत. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी पक्षामध्ये नवीन कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळेल. विरोधी पक्षातील काही कार्यकर्ते हे सोयीनुसार आमच्याबाबत अफवा पसरवत आहेत. ही बाब चुकीची आहे. आमच्या सोबत १२ हत्तीचे बळ असणारे नेते अजित पवार आहेत. त्यांचा आदेश शिरसंवाद्य मानून या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी आमदार राहुल कुल यांचे काम करणार आहेत. कार्यकर्त्यांनी आमचे निरोपाची वाट न पाहता आजपासून कामाला लागावे. यावेळी गुरुमुख नारंग, नंदू पवार, अनिल साळवे, निखिल स्वामी, सुहास वाघमारे, आनंद बगाडे उपस्थित होते.