Pune District: आम्ही तुमच्या पाठीशी राहिलो, आता निधी द्या

भवानीनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ढेकळवाडी गाव महायुतीच्या पाठीशी भक्कम उभे होते. गावचा विकास करण्याची जबाबदारी सुद्धा महायुतीचीच असल्याने भाजपा युवा मोर्चाचे महामंत्री वैभव सोलनकर यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे ढेकळवाडी गावासाठी निधीची मागणी केली आहे.
ढेकळवाडी अंतर्गत रस्त्यांची या गावासाठी अत्यंत गरज आहे. गावांमधील हे रस्ते प्रमुख आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावरून दळणवळण होते. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये या गावाने नेहमी आपल्याला साथ दिली आहे.
त्यामुळे ढेकळवाडी अंतर्गत सोनगाव रस्ता ते दयानंद घुलेघर रस्ता करणे 10 लाख, अविनाश भिसे घरा शेजारील उर्वरित रस्ता करणे 10 लाख, ढेकळवाडी अंतर्गत खताळपट्टा येथे दादा मासाळ वस्ती ते आप्पा मासाळ वस्ती रस्ता करणे 10 लाख, ढेकळवाडी अंतर्गत खताळपट्टा येथे शेळके वस्ती येथे रस्ता करणे 10 लाख, रामजी देवकाते वस्ती रस्ता करणे 10 लाख, खताळपट्टा झारगड वाडी रोड ते बबलु बलवंड रस्ता करणे 10 लाख, विक्रम बलवंड वस्ती ते माने वस्ती गटर लाईन करणे 10 लाख, ढेकळवाडी अंतर्गत शंकर झारगड वस्ती ते डोंबाळे वस्ती गटर लाईन करणे, ढेकळवाडी अंतर्गत खताळपट्टा येथे शेळके वस्ती लोखंडे वस्ती देवकाते वस्ती गटार लाईन करणे 10 लाख, ढेकळवाडी अंतर्गत डिपी ते आनंद टकले वस्ती रस्ता करणे 10 लाख, ढेकळवाडी काटेवाडी रस्ता ते अक्षय ठोंबरेघर शेंबाडा 10 लाख, अशी निधीची मागणी भाजपा युवा मोर्चा चे पुणे जिल्हा महामंत्री वैभव सोलनकर यांनी केली.





