पुणे जिल्हा : जल जीवन हा विचार भविष्यात जबाबदारीचा – आढळराव पाटील

वाघोली भागात प्रचार दौरा
महावीर जयंतीच्या शोभायात्रेत जैनधर्मियांना दिल्या शुभेच्छा
वाघोली – जल जीवन हा विचार भविष्यात जबाबदारीचा ठरणार आहे. जलसंवर्धन, पाणी बचत, वृक्षारोपण आणि संगोपन हे आपले आद्य कर्तव्य ठरणार असल्याचे प्रतिपादन महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या वाघोली दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधताना केले. वाढत्या शहरीकरणामुळे जलस्त्रोतांवर ताण येत आहे. पाण्याचे प्रश्न आणि ड्रेनेज, एसटीपी प्रकल्पांच्या अडचणी दूर करण्यासाठी माझा प्राधान्यक्रम राहील, असे त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले. दौऱ्यात त्यांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. वाघोली येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या दौऱ्याचा प्रारंभ झाला.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, वाघोली माजी उपसरपंच नगरसेवक शांतारामबापू कटके, भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव, राष्ट्रवादी काँग्रेस हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, भाजपा उपाध्यक्ष विजयराव जाचक, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश सातव, भाजपच्या किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब सातव, माजी पंचायत समिती सदस्य शाम गावडे, युवासेना जिल्हा संघटक गणेश मस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना कटके, माजी उपसरपंच वाघोली महेंद्र भाडळे,
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष रमेश उंद्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष पूनम चौधरी, महिला राष्ट्रवादी उपाध्यक्ष ज्योती थोरात, जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस योगिता सातव, वाघोली महिला मोर्चा अध्यक्ष विद्या पाटील, केसनंद फाटा येथील जैन श्रावक संघाच्या वतीने आयोजित महावीर जयंती रॅलीत,जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दीपक कर्नाड, सचिव मनोज कांकरिया, उपाध्यक्ष निलेश शेटीया, माजी अध्यक्ष चंद्रशेखर लुंकड उपस्थित होते.
विविध सोसायट्यांना भेटी
प्रचारदौऱ्यादरम्यान आढळऱाव यांनी ऑक्सीव्हॅली सोसायटी, नियती वेलान सोसायटी, निओ सिटी सोसायटी, ड्रीम संकल्प सोसायटी, मॅपलवुड सोसायटी, श्रीराम पॅराडाईज, राधेश्वरी नगरी, आयव्ही बॉटनिका सोसायटी, आदींमधील रहिवाशांशी संवाद साधला. त्यांच्या ड्रेनेज तसेच एसटीपी प्रकल्पाचे प्रश्न मार्गी लावणे हे माझे आद्य कर्तव्य असेल, ही कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन आढळराव यांनी यावेळी सोसायटी सभासदांना दिले. दरम्यान वाघोलीचे उपसरपंच मारुती गाडे यांच्या निवासस्थानी देखील आढळराव यांनी भेट देऊन कुटुंबीयांशी संवाद साधला.
पुष्पवृष्टीने स्वागत
महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून बीजेएस महाविद्यालयाजवळ आढळराव यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. त्यावेळी महायुतीतील महिला पदाधिकाऱ्यांनी ”घड्याळ तेच, वेळ नवी” चा नारा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरुर हवेलीचे विधासभा संयोजक प्रदीप कंद,वाहतूक सेनेचे राजेंद्र तांबे उपस्थित होते.
भगवान महावीरांनी अहिंसा, सहिष्णूतेची शिकवण आपल्याला दिली. मानव आणि प्राण्यांप्रती जिव्हाळ्याचे जगणे असले पाहिजे हा विचार त्यांनी दिला. आदर्शवत विचारांतून मार्गक्रमण करणे ही काळाची गरज आहे.
– शिवाजीराव आढळराव पाटील, महायुतीचे उमेदवार, शिरुर लोकसभा मतदारसंघ.





