पुणे जिल्हा : राजुरीत सर्वपक्षीयांना गावबंदी

राजुरी – जुन्नर तालुक्यातील राजुरी गावाने एकमुखाने ठरविले की, मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सर्वच पक्षाच्या पुढाऱ्यांना गावाकडून गावबंदी जाहीर करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत देऊन आपले उपोषण स्थगित केले होते; परंतु 40 दिवसानंतरही सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे 25 ऑक्टोबरपासून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे.
मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही पुढाऱ्याला गावात येऊन देणार नाही असा निर्णय सर्व राजुरी ग्रामस्थांनी मिळून घेतला असून चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष,
मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष, मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला व नेत्याला गावात प्रवेश नाही. असा फलक लावून जोरदार निषेध केला. यावेळी राजुरी, उंचखडक, आबा टेक, गावातील मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.





