वाघोली : लोखंडी शस्त्राने वाहनांच्या काचा फोडून दहशत पसरविण्यात आल्याची घटना वाघोली येथील एस टी कॉलनी येथे मंगळवारी (दि. 25) मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कॉलनी येथे मध्यरात्री एक जण हातामध्ये कोणतेतरी लोखंडी शस्त्र घेऊन गाड्यांचे काचा फोडत मोठ्याने आरडा ओरडा करत हातातील लोखंडी शस्त्र हवेत फिरवून, दहशत करत होता. त्याने चार वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. त्यानंतर तो पसार झाला. घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर याबाबत ज्ञानदेव मेहेत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाहनाचा काचा फोडून, मोठमोठ्याने आरडा ओरडा करत, हातातील लोखंडी शस्त्र हवेत फिरवुन, दहशत करून वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वाघोली पोलीस करीत आहेत.