पुणे जिल्हा : वळतीकर मताधिक्याची परंपरा राखणार

महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचाराचा वळतीत शुभारंभ
मंचर – विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार देवदत्त निकम यांना वळसे पाटलांनीच भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्षपद, बाजार समितीचे सभापती पद दिले; परंतु त्यांना जाण राहिली नाही. आता ते वळसे पाटील यांच्यावर एकेरी भाषेत खालच्या पातळीवर टीका करत आहेत. जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील यांनी दिला.
महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी केले. गेल्या 35 वर्षांत तालुक्यातील सर्वच गावांमध्ये विविध विकास कामे करून तालुक्याचा कायापालट केला. राज्यात एक सक्षम नेता म्हणून वळसे पाटलांची ओळख आहे. या नेतृत्वाचे हात अधिक बळकट करण्यासाठी वळती गाव पुन्हा एकवटले. वळसे पाटलांना आत्तापर्यंत वळती गावाने सर्वच निवडणुकांमध्ये मताधिक्य दिले आहे.
मताधिक्क्याची परंपरा कायम राखण्याचा निर्धार करून वळती येथे ग्रामस्थांनी उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून उत्साहात शुभारंभ केला. यावेळी शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. भाजपचे पक्षनिरीक्षक अतुल ब्रह्मभट, शरद बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, बारकू बेनके,
भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, उद्योजक मनोहर शेळके, वैभव उंडे, किसनराव लोखंडे, महादू भोर, गोविंद गांजवे, महेश भोर, जनाबाई अजाब, निर्मला भोर, बाबाजी लोखंडे, आरती खुडे, सुप्रिया अजाब, तबाजी लोखंडे, संतोष शेळके, संतोष भोर, अतुल भोर, अजित भोर, कासिम मुलाणी यांच्या सह विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजीराव लोंढे म्हणाले वळती गावाने आता पर्यंत वळसे पाटील यांना 78 टक्क्यांपर्यंत मताधिक्य दिले आहे. या निवडणुकीत देखील मतदानाचा टक्का आणखी वाढेल. असे आम्हाला खात्री आहे.
आंबे विक्रीचा व्यवसाय, चोर्यांचा नाही
देवदत्त निकम आता प्रचार सभांमध्ये मला ते आंबेवाला म्हणून प्रचार सभांमध्ये हिणवत आहेत. काही हरकत नाही; परंतु आमचा गेली चार पिढ्यांचा आंब्यांचा व्यवसाय आहे. आम्ही आंबे विक्रीचा व्यवसाय करतो. तुमच्यासारख्या चोर्या, लांडी – लबाड्या करून जमिनी खरेदी करत नाही. असा टोला निकम यांना भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी लगावला.





