Pune District: दोन हजार टन कांदा साठवणार

बेल्हे : निमगाव सावा (ता. जुन्नर येथील श्री विघ्नहर कृषी प्रोडूसर कंपनीचा प्रकल्प 2 हजार टन कांदा साठवून होईल ही शक्यता मोठ्या क्षमतेचा आहे अशी माहिती कंपनीची संचालक व कृषी पदवीधर सचिन गाडगे यांनी दिली.
आत्माचे महाराष्ट्र राज्य संचालक अशोक किरनळी व पुण्याचे प्रकल्प संचालक सुरज मडके यांनी जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील श्री विघ्नहर कृषी प्रोडूसर कंपनी लिमिटड या कंपनीत भेट देऊन कंपनीच्या सद्यस्थितीच्या कामाची पाहणी केली. तसेच भागधारकांशी संवाद साधला.
कांदा पिक व काढणे पश्चात घ्यावयाची काळजी यावर अनुभव संचालकांनी सांगितला. यावर्षी बाजार भाव समाधानी असल्याचे सांगितले. त्यासाठी कांदा साठवणूक चाळ अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. निमगाव सावा गावामध्ये होत असलेल्या प्रकल्प शेतकर्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे संचालकांनी सांगितले.
यावेळी उपस्थित कंपनीचे संचालक गणपत गाडगे, शंकर काटे, सुभाष खरमाळे, नवनाथ जोरी, शांताराम ट्टू हे उपस्थित होते. भेटीच्या वेळी आत्मा पुणे महाराष्ट्र राज्याचे संचालक अशोक किरनळी, आत्मा पुण्याचे संचालक सुरज मडके, जुन्नर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, व मंडल कृषी अधिकारी शिवकांत कोल्हे, कृषी सहाय्यक राणू आंबेकर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सूर्यकांत विरणक व श्री विघ्नहर कृषी प्रोडूसर कंपनीच्या संचालक शेतकरी उपस्थित होते.





