Pune District : ..तर 100 टन ऊस उत्पादन शक्य

रूई येथील शेतकरी मेळाव्यात डॉ. अंकुश चोरमले यांचे प्रतिपादन
कळस – ऊस लागवड पद्धत बदलल्यास 100 टन उत्पादन सहज शक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. अंकुश चोरमले यांनी केले.
इंदापूर तालुका अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि देहात यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादक शेतकर्यांचा रुई (ता. इंदापूर) येथे नुकताच शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी डॉ. चोरमले बोलत होते. यावेळी देहातचे सुधीर मोरडे, सरपंच अमरसिंह पाटील, यशवंत कचरे, बापू लावंड, दिलीप मारकड पाटील, अनिल कांबळे, आकाश कांबळे, महादेव माने, विष्णुबाला मारकड-पाटील, किरण सरगर, सौरभ पोटफोडे, अंकुश पाटील, वैभव मोरे, अविनाश पालकर आदी उपस्थित होते.
डॉ. चोरमले म्हणाले की, ऊसलागवड करताना दोन सरीतील अंतर कमीत कमी पाच व जास्तित्त जात आठ फूट असावे, माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे, किडी आणि रोग यांची ओळख आणि व्यवस्थापन अतिषय महत्त्वाचे आहे. या वेळी शेतकर्यांच्या विविध समस्या आणि अडचणी यावर डॉ. चोरमले यांनी मार्गदर्शन करून त्यांनी उपाययोजन सुचविल्या आहेत.
तसेच देहात कंपनीचे व्यवस्थापक अमोल पाटे यांनी मका पीक व्यवस्थापन बद्दल मार्गदर्शन करून शेतकर्यांकडून येणार्या अडचणी बद्दल मार्गदर्शन केले. इंदापूर तालुका अॅॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सभासद शेतकर्यांसाठी उत्पादन वाढण्यासाठी संपूर्ण व्यवस्थापनासाठी प्रत्येक महिन्याला मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत असे वैभव पाटील यांनी सांगितले. सूत्रसंचालन तानाजी मरकड यांनी तर वृषभ मोहिते यांनी आभार मानले.
युरिया वापरणे बंद करा
पारंपरिक पद्धत बंद करून खात्रीशीर भेसळमुक्त बियाणे वापर करणे, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी पाचट जाळणे बंद करून हिरवळीच्या खतांचा वापर केला पाहिजे जमिनीचा पोत सुधारण्यावर सुरुवातीला काम केल पाहिजे. रासायनिक खतांचा अतिवापर बंध करून सल्फर युक्त खतांचा वापर वाढवावा युरियाचे भयानक दुष्परिणाम असून युरिया वापरणे बंद करण्याचे आवाहन डॉ. चोरमले यांनी केले आहे.





