Pune District : तुकाराम महाराज पालखीच्या पादुकांना सराटी येथे नीरा स्नान

नीलकंठ मोहिते
इंदापूर –
हर हर महादेव संभा ।
काशी विश्वनाथ गंगा ॥
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीतील पादुकांना निरास्नान अत्यंत पवित्र समजले जाते. हीच नीरा नदी पुढे चंद्रभागेला मिळते. हजारो वारकर्यांनी चरण पादुकांना स्नान घालताना, अभंग गात, विधिवत पौराहित्य करत, पादुकांना सराटी येथे नीरा नदी पात्रात, नीरा स्नान विधी मंगळवार (दि. 1 जुलै)रोजी सकाळी भक्तिमय वातावरणात पार पाडला.
नीरा नदी पात्रात पाणी असल्याने वारकर्यांनी समाधान व्यक्त केले. व मानाच्या दिंडीकरांनी, विणेकरांनी वारकर्यांनी स्नानाचा आनंद घेतला. नीरा नदीपात्रात सकाळी पादुकांना लक्षवेधी असा स्नानाचा सोहळा ज्ञानोबा तुकारामाच्या गजरामध्ये पार पडला. यावेळी पादुकांना पुष्पहार घालण्यात आले. तसेच पादुकांची आरती करण्यात आली. यावेळी प्रशासनाने नदीपत्रात पाणी असल्याने वारकर्यांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेतली होती. निरा स्नान सोहलळ्यास पालखी प्रमुख, देहू संस्थानचे विश्वस्त, शासकीय अधिकारी, वारकरी उपस्थित होते. नीरा नदीमध्ये पादुकांना स्नान विधी सोहळा झाल्यानंतर पालखी सोहळा प्रमुखांच्या हस्ते सहकार्यांबद्दल उपस्थित शासकीय अधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी पालखी खांद्यावरती घेऊन रथामध्ये ठेवली.
यावेळी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आप्पासाहेब गुजर, उपअधीक्षक अविनाश डोईफोडे, डीवायएसपी मधुकर भटे, डीवायएसपी डॉ. सुदर्शन राठोड, जिल्हा विशेष शाखा पीआय प्रवीण मोरे, महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, पीआय सूर्यकांत कोकणे, सुशील पवार, विस्ताराधिकारी अजित घोगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम, पी आय महादेव वाघमोडे,
बारामती पी आय चंद्रशेखर यादव, बांधकाम उप अभियंता शिवाजी राऊत, डॉ. सुरेखा पोळ, डॉ. ज्ञानेश्वर बाहेगव्हाणकर, डॉ. अभिषेक ताटे, डॉ. धनश्री हासे, सराटी गावचे उपसरपंच संतोष कोकाटे, समीर तांबोळी, बापूसाहेब कोकाटे, हनुमंत कोकाटे, मनोज जगदाळे, अण्णासाहेब कोकाटे, युवराज जगदाळे, नितीन जगदाळे, लक्ष्मण महाराज कुरळे, अण्णा कोळी, महादेव कोळी, राम कोळी, लक्ष्मण कोळी, तानाजी कोळी, ग्रामसेवक अर्जुन साळुंखे, गोविंद कोकाटे, यांच्यासह सराटी व परिसरातील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याला निरोप दिला.
पुणे जिल्ह्यातील पोलीस, महसूल, आरोग्य, ग्रामविकास आदी विभागातील वरिष्ठ शासकीय अधिकार्यांनी पालखी सोहळ्यास निरोप दिला. त्यानंतर नीरा नदी ओलांडून पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. सोलापूर जिल्ह्याच्या वतीने खासदार धैर्यशील पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्याधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, आरोग्य जिल्हाधिकारी संतोष जाधव व इतर अधिकारी वर्ग यांनी जोरदार स्वागत केले.





