पुणे जिल्हा : डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र यंदा कोरडेच

– पाणलोट क्षेत्रामुळे गहू, बाजरी, कांदा पिकाचं मोठे उत्पादन
शिवाजी गाडे
डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवाशी अति दुर्गम भागातील परिसरामद्ये असणाऱ्या पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे यंदा झपाट्याने कोरडे झाले आहे. डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे या वर्षी या भागामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तुडूंब भरून वाहत होते.
या मुळे या परिसरातील; पाटण म्हाळूंगे कुशिरे खु .. मंगोली भेंडारवाडी कोलटवडे ही गावे ओलिताखाली येऊन या भागातील शेतकरी या पाणलोट क्षेत्राखाली उपसा सिंचनाद्वारे मोठ्या प्रमाणात रब्बी पिके घेऊ लागला. या पाणलोट क्षेत्रामुळे आदिवासी शेतकरी पाणी उपसा सिंचनाद्वारे गहू, बाजरी, बटाटा, मेथी, कांदा व इतर मोठ्या प्रमाणात पिके घेऊ लागला. गतवर्षीपेक्षा या वर्षी वरूण राजाने लवकरच काढता पाय घेतल्यामुळे या वर्षी लवकरच डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे कोरडे पडले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर भागातील व पाटण खोरे मुसळधार पावसाचे महेर घर समजले जाते. पावसाळ्यातील चार महिने या खोऱ्यामद्ये राहणाऱ्या जनतेला सूर्य व चंद्राचेही दर्शन लवकर होत नाही. चार महिने मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्याचप्रमाणे या पाणलोट क्षेत्रात अनेक खोऱ्यांमद्ये छोटछोट्या पद्धतीची कोल्हापूर पद्धतीची बंधारे बांधून पाणी अडवले जाते.
डोगर माथ्यावरून येणारे पाणी या बंधाऱ्यात अडवले जाते. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात सध्या भाताची रोपे शेतात डोलू लागली आहेत. या मुळे डोंगर माथ्यावरून अगदी धरणी मातेने जणू हिरवा शालू पांघरला आहे, असे दिसून येते. काही दिवसांपासून या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ आणि अवेळी झालेला पावसाने भातखाचरांतील पाणी साठू लागल्याने भात रोपे लागवडीसाठी आदिवासी शेतकर्यांना अधिक पावसाची प्रतीक्षा आहे.
आंबेगाव तालुक्यात एकूण ५५00 हेक्टरएवढे एकूण भातक्षेत्र आहे. मात्र, यंदा भातलागवडी सुरू होताच मान्सूनचे आगमन लवकर झाल्याने जून महिन्याच्या सुरवातीलाच आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातून अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. भात खाचरे भाजणीची कामे मार्गी लावून बळीराजा आता शेतात कुळवणी तसेच पावसामुळे भाताची रोपे टाकण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. पावसामुळे भात भातखाचरांत आलेले पाणी आटू लागले असून चिखलणीसाठी पाणी वापरून बळीराजा भात रोपाची लागवड करीत आहे.
कुळवणीसाठी शेतकरी सरसावले
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मागील आठवड्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे सर्वत्र भातखाचरांत पाणी उपलब्ध झाले आहे. सध्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील सर्वत्र भात रोपे शेतात डोलताना दिसत आहे. तालुक्याच्या भीमाशंकर, पाटण व आहुपे,तळेघर साकेरी खोर्यातील दुर्गम भागातील आदिवासी गावांतील भातलागवडीसाठी आपल्या शेतात कुळवणी करण्यात आदिवासी शेतकरी सरसावले आहेत. गोहे व आहुपे व पाटण खोर्यातील असाणे, अडिवरे, पाटण, महाळुंगे, बेंढारवाडी येथील शेतकर्यांचे वार्षिक उत्पन्न हे भात पिकावरच अवलंबून असल्याचे दिसते. मात्र, शासन आम्हाला कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नाही. या ठिकाणी पिकलेला भात हा कमी किमतीत आदिवासी बांधवांकडून खरेदी केला जातो.
आदिवासीची मागणी
आंबेगाव तालुक्याचा पश्चिम पट्टा हा आदिवासी जनतेच्या उशाला असणाऱ्या डिंभे जलाशयावर जरी अवलंबून असला तरी सावरली, साकेरी, पाटण व दिगद खोऱ्यातील जनतेला आजही घशाला कोरड पडली आहे. पाणलोट क्षेत्रामुळे आदिवासी जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी या भागात उपसा जलसिचन योजना लवकरात लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी या भागातील आदिवासी जनतेने केली आहे.





