पुणे जिल्हा : महात्मा फुले यांच्यामुळे खेड्यात शिक्षणाची गंगा पोहोचली

मंचर : महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी काम करत असताना त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. यामध्ये अनेक गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महात्मा फुले यांनी खेड्यापाड्यातही शिक्षणाची गंगा पोहोचवल्याने आर्थिक विकास झाला आहे, असे मत प्राचार्य उत्तमराव आवारी यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मंचर तालुका आंबेगाव येथे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य उत्तम आवारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापिका सुरेखा भांगरे,पर्यवेक्षक यादव चासकर, रामदास पिंगळे, अजित बारवे, सखाराम गवारी, संगीता टिकले, विठ्ठल मोरे, अमोल ठुबे उपस्थित होते.
यानिमित्ताने वर्षा तेली,शर्वरी थोरात,आराध्या निघोट,वृंदा शेटे या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. बहुजन,गोरगरीब विशेष करून स्त्रियांच्या शिक्षणासाठी महात्मा फुलेंनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले,असे मत यावेळी प्राचार्य उत्तम आवारी यांनी व्यक्त केले.
सृष्टी इंदोरे हिने सूत्रसंचालन केले. अशरफ पठाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन विजय शेळकंदे,कल्याणी बांगर,नीलिमा चव्हाण,दत्तात्रय चासकर,दिलीप चौधरी, संजय तारू,मारुती बोराडे यांनी केले.





